
पेटलेली मुंबई बाळासाहेबांनी शांत केली - एकनाथ शिंदे
मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ठोक पणे बोलायचे. ते कुणालाही घाबरत नव्हते. बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मशीद पाडल्यानंतर महाराष्ट्रात दंगली उसळल्या होत्या. मुंबई पेटली होती. पेटलेल्या मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसैनिक त्यात सहभागी झाले होते. आंदोलन केले होते. कार सेवकांनी सहभाग घेतला होता. बाबरी मशीद पाडल्यानंतर राम मंदिर बांधण्यासाठी ठाणेकरांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांनी चांदीची वीट दिली होती. तसेच बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे बाळासाहेब ठाकरे छातीठोकपणे म्हणाले होते.
हेही वाचा: चारधाम यात्रा : ‘मोक्षा’साठी यात्रेकरूंचा मृत्यू; भाजप प्रवक्तांचे विधान
बाबरी मशीद पाडल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. मुंबईत दंगली उसळल्या होत्या. हिंदू-मुस्लिम एकमेकांसमोर आले होते. तेव्हा न घाबरता बाळासाहेब ठाकरे पुढे आले आणि पेटलेल्या मुंबईला शांत केले. त्यावेळी त्यांनी दंगलीपासून मुंबईला बाचवले होते. त्यावेळी पाकिस्तानातील दहशतवादी कोणालाच घाबरत नव्हेत. ते फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच घाबरत होते, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.
बाळासाहेब ठाकरे कधीही पलटले नाही
घाबरले ते बाळासाहेब कसले, भीले ते बाळासाहेब कसले, ते कधीही घाबरले नाही. ते आपल्या शब्दावरून कधीही पलटले नाही. हो म्हटलं जे करायचं ते करून घे असे स्पष्टपणे बोलायचे. आजचे नेते आपल्या अंगावर प्रकरण येत आहे असे दिसले की मी अस बोललो नाही, असे म्हणतात. मात्र, बाळासाहेब ठाकरे कधीही आपल्या शब्दावरून पलटले नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
Web Title: Balasaheb Thackeray Save The Burning Mumbai Eknath Shinde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..