पटोले-थोरात वाद पेटला; पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, वाद सोडवण्याठी बडा नेता मुंबईत दाखल I Politics News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thorat Nana Patole Dispute

Politics News : पटोले-थोरात वाद पेटला; पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, वाद सोडवण्याठी बडा नेता मुंबईत दाखल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेनंतर दिल्लीतील काँग्रेस (Congress) पक्षाच्या नेत्यांना प्रदेश काँग्रेसमधील अनागोंदीची गंभीर दखल घ्यावी लागलीये.

महाराष्ट्र काँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) मुंबईत दाखल झाले आहेत. एच. के. पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरातांची भेट घेणार असून या भेटीत नेमकं काय घडतंय हे पाहावं लागणार आहे.

थोरातांच्या भेटीनंतर पाटील पक्षातील नेत्यांबरोबर बैठक घेणार असल्याचं कळतंय. यापूर्वी राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांना तातडीनं दिल्लीत दाखल होण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आज पाटील मुंबईत दाखल झाले आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षतेखाली काम करणं अशक्य असल्याचं पत्र बाळासाहेब थोरात यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पाठवलं असून आपण विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं होतं.