Congress: नाना पटोलेंना राहुल गांधींचा फोन; भारत जोडोनंतर कॉंग्रेसमध्ये बदलले समीकरण?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला.
Balasaheb Thorat Nana Patole Maharashtra Congress Politics Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
Balasaheb Thorat Nana Patole Maharashtra Congress Politics Rahul Gandhi Bharat Jodo Yatra esakal

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी त्यांंनी, नाना पटोले यांच्या विरोधातली नाराजी बोलून दाखवली होती. दरम्यान, राजीनाम्यापूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाना पटोलेंसोबत फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्त वितर्क लावण्यात येत आहेत. भारत जोडो यात्रेनंतर राज्यातील कॉंग्रेमध्ये समीकरणं बदलत चाललं अशा चर्चेला उत आला आहे. (Balasaheb Thorat Nana Patole Maharashtra Congress Politics Rahul Gandhi Bharat Jodo Yatra )

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या पत्रानंतर राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात फोनवरुन चर्चा झाली आहे. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाणं आलं आहे.

पटोले राहुल गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि पटोले यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी, पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत कलाहावर चर्चा झाली. हायकमांडकडून पक्षांतर्गत कुरबुरींवर लक्ष न देण्याचा सल्ला नाना पटोले यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यात्रेनंतर समीकरण बदललं?

भारत जोडो यात्रेतली पटोलेंची राहुल गांधींसोबत दिसलेली जवळीक पाहता हायकमांडक राज्यातील घडामोडींवर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काही दिवसांपूर्वी, राहुल गांधींची देशभरात भारत जोडो यात्रा पूर्ण झाली. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत राहुल गांधींनी पायी दौरा करत ही यात्रा केली. श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप झाला. यावेळी राहुल गांधींच्या जाहीर सभेत नाना पटोले यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यापूर्वी, महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा पोहचली होती तेव्हादेखील नाना पटोले यांनी सहभाग घेतला होता.

या यात्रेनंतर महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद वाढताना पाहायला मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला पत्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी अपमानास्पद वागणूक देण्यात आली. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आल्याचाही आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. वाद मिटवण्याऐवजी विकोपला गेला.

अनेक कार्यकर्त्यांवर कारवाई झाली. पक्षाच्या बैठकीत देखील खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करण्यात आली. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

स्थानिक नेते विरुद्ध नाना पटोले असा संघर्ष देखील शिगेला पोहचला आहे. आधीच प्रदेशाध्यक्षपदासाठी विदर्भातून सुनिल केदार, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे मात्तबर नेते असतानाही भाजपातून आलेल्या नानांना संधी देण्यात आली.

दुसरीकडे थोरातांसारख्या वरिष्ठ नेत्याकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतल्यानेही पक्षात नाराजी होती. पक्षातली दुफळी वारंवार समोर येऊनही काँग्रेसची परिस्थिती जैसे थेच आहे. एकेकाळी पहिल्या क्रमांकावर राहणारा हा पक्ष विधानसभेला थेट चौथ्या क्रमांकावर घसरलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com