पवार जो निर्णय घेतील तो हिताचा असेल : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील, तो आघाडीसाठी हिताचा असेल. पुढचा निर्णय लवकरच होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

मुंबई : सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील, तो आघाडीसाठी हिताचा असेल. पुढचा निर्णय लवकरच होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रात 288 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याने भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकार आघाडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे या तीन पक्षांच्या फॉर्म्युल्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहेत. 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची सुनावणी आता जानेवारीत

शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही. पण, आज किंवा उद्या आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आज बाळासाहेब थोरात यांनी पवारांना पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb Thorat says he fully trusts Sharad Pawar