निधनाआधी शंकरराव कोल्हेंनी गृहमंत्र्यांना पाठवलेलं 'पत्र'; वळसे-पाटलांनी कालच दिलेलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shankarrao Kolhe vs Dilip WalsePatil

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं आहे.

निधनाआधी शंकरराव कोल्हेंनी गृहमंत्र्यांना पाठवलं होतं 'पत्र'

Shankarrao Kolhe Passes away : सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे (Shankarrao Kolhe) यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भूमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी दु:ख व्यक्त केलंय.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी आपल्या ट्विटटमध्ये लिहिलंय, शंकरराव कोल्हे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते होते. शंकररावांनी आयुष्यभर शेती, शेतकरी, सहकारासाठी काम केलंय. माझ्या आणि त्यांच्या वयात अंतर होतं. मात्र, तरी देखील शंकररावांशी घनिष्ठ परिचय होता. शंकररावांनी चार दिवस आधी ख्याली-खुशाली विचारणारं पत्र पाठवलं होतं, त्या पत्राला कालच मी उत्तर पाठवलं. त्यांच्या निधनाची ही दुःखद बातमी आहे. शंकररावांच्या कुटुंबीयांच्या दु:खत आम्ही सहभागी आहोत, असं त्यांनी नमूद केलंय.

Shankarrao Kolhe vs Dilip WalsePatil

Shankarrao Kolhe vs Dilip WalsePatil

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍या शंकरराव कोल्हे यांच्या निधनानं सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपल्याची भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलीय. राज्यातील कृषी उत्पादनातल्या प्रयोगशीलतेला व्यापक चालना दिली, ती शंकरराव अप्पांनी. शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात विद्यार्थीदशेतच त्यांना स्थान मिळालं होतं. अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी कोपरगाव व संजीवनी कारखान्यांच्या माध्यमातून परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला. पाण्याचा प्रश्न सोडवला. खंडकरी शेतकर्‍यांची चळवळ चालवली. तसेच सहकारी संस्थांसोबत शिक्षणसंस्थांचं मोठं जाळं उभारलं. साखर या विषयासाठी जगभ्रमंती करून शंकररावांनी प्रचंड व्यासंग केला. ग्रामीण विकासासाठी आंतरिक तळमळ आणि प्रबळ इच्छाशक्ती हे त्यांचं गुणविशेष सामाजिक क्षेत्रात नव्यानं येणाऱ्या कार्यकर्त्यांनी अंगीकरावं, असंही पवारांनी सांगितलं.

हेही वाचा: नवाब मलिकांना ईडीचा पुन्हा दणका; फराज मलिकला तिसरं समन्स पाठवणार

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या निधनानं राज्याच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचं मत मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केलंय. शंकररावांनी समाजकारणासह राज्याच्या सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Web Title: Balasaheb Thorat Sharad Pawar Dilip Walse Patil Paid Tributes To Former Minister Shankarrao Kolhe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..