Tobacco Products : राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर पुन्हा एक वर्षांसाठी बंदी

राज्य शासनाने गुटखा, सुगंधी पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी कायम ठेवली.
tobacco products
tobacco productssakal

पुणे - राज्य शासनाने गुटखा, सुगंधी पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी कायम ठेवली आहे. गुरुवारपासून (ता. २०) वर्षभरासाठी पुन्हा बंदी लागू होत आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी या बाबतचे आदेश दिले आहेत.

तरुण पिढी गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाकडे वळू नये, यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने पाच वर्षापूर्वी बंदी लागू केली. गुटखा, सुगंधी पानमसाला, मावा यांची विक्री व उत्पादनावर बंदी घातली गेली. नागपूरचे शासकीय दंत महाविद्यालय, सलाम बॉम्बे फाउंडेशन, टाटा ममोरियल ट्रस्टसह अन्य स्वयंसेवी संस्थांच्या पाहणीत तोंडाच्या कर्करोगाचे गंभीर परिणाम समोर आले.

२०१५-१६ मध्ये १५१ आणि २०१६-१७ मध्ये ८५९ जणांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात २०१५-१६ मध्ये २१ कोटी ८१ लाख, तर २०१६-१७ मध्ये २२ कोटी ९८ लाखांचा गुटखा जप्त झाला. देशात २६ राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशात गुटखाबंदी लागू आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारावर शासनावर साठ टक्क्यांपर्यंत आर्थिक भार पडतो.

गेल्या चार वर्षात अन्न, औषध प्रशासनाने विविध ठिकाणी छापे टाकून छुप्या मार्गाने येणारा गुटखा जप्त केला. दरवर्षी वर्षभरासाठी बंदीला मुदतवाढ दिली जाते. २०२२-२३ साठी पुन्हा बंदी आदेश लागू झाला आहे.

३५५ कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त

परराज्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने गुटखा व पानमसाल्याचा साठा राज्यात येतो. ट्रकसह इतर वाहनांचा यासाठी वापर करण्यात येतो. राज्यातील स्थानिक बाजारपेठेत त्याचे वितरण केले जाते. अशा पद्धतीने राज्यात आलेला ३५५ केटी ७८ लाख रुपयांचा प्रतिबंधित साठा अन्न व औषध प्रशासनाने गेल्या नऊ वर्षांमध्ये जप्त केला आहे. आठ हजार २३५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नऊ हजार १५३ खटले न्यायालयात दाखल केले आहेत.

माव्याची मागणी वाढली

अन्न,औषध प्रशासन गुटखाबंदीसाठी प्रयत्नशील असले तरी चोरट्या मार्गाने येणारी वाहतूक कमी झालेली नाही. लगतच्या राज्यात गुटखाबंदी लागू नसल्याने तेथून गुटख्याची वाहतूक सुरूच आहे. मात्र, त्याची किंमत वाढली आहे. त्यामुळे आता माव्यासारख्या पदार्थांची मागणी वाढत असल्याचे निरीक्षण व्यावसायिकांना नोंदले.

- तंबाखूजन्य पदार्थांनी निगडित राज्याचा २०११चा खर्च दोन हजार २९० कोटी रुपये होता. हा खर्च फक्त ३५ ते ६९ वर्षे वयोगटातील होता. त्यापैकी ६२ टक्के खर्च हा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च होता. तर, ३८ टक्के अप्रत्यक्ष रोगग्रस्त स्थितीतील व्यक्तीसाठी होता.

- राज्यात कर्करोग, क्षयरोग, श्वसनाचे विकार, हृदयविकार यांच्यासाठी आर्थिक खर्चाची रक्कम ७६९ कोटी रुपये आहे. त्यात हृदयरोगासाठी आर्थिक बोजा ४४९ कोटी रुपये पडतो. हा सर्व खर्च फक्त तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आहे.

- स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये तंबाखूमुळे होणाऱ्या रोगांच्या उपचारासाठी जास्त खर्च येतो.

'गुटखा बंदीमुळे तो सहजासहजी मिळत नाही आणि मिळणारी पुडी महाग मिळते. त्यामुळे गुटखा सुटला. तो मिळत नसल्याने गुटखा खाण्याची सवय सुटायला मदत झाली,'

- अतुल सरोदे, व्यापारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com