BJP Leader Navneet Rana Challenge Bangladesh Govt : गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या अत्याचाराविरोधात देशातील विविध भागात निषेध मोर्चांचं आयोजन करण्यात येत आहेत. अमरावतीतही भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना नवनीत राणा आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.