NCP ला मोठा धक्का! शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मतानं पराभव; शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकाचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Bank Election

NCP ला मोठा धक्का! शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मतानं पराभव

कुडाळ (सातारा) : सातारा जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत जावळी तालुका सोसायटी मतदारसंघात संघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचा एक मताने विजय झाला असून, आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालानं जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनेक घडामोडी यामुळे घडणार आहेत. या निवडणुकित 49 मतदानापैकी आमदार शिंदे यांना 24 मते मिळाली, तर विजयी उमेदवार रांजणे याना 25 मते मिळाली. जावलीतील एक जागेसाठी 100 टक्के मतदान झाले होते. सर्वच्या सरर्व 49 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवार (ता. 23) साताऱ्यात सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ झाला.

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही जागांवरील निकाल हाती आले आहेत. राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलनं मुसंडी मारली असली तरी सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या जावळी सोसायटी मतदारसंघातील निकालाबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली होती. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांच्यात सरळ लढत झाल्याने व आमदार शिंदे हे जिल्ह्यातील हेविवेट नेते असल्याने त्यांचे राजकीय कसब या निवडणुकीत पणाला लागले होते. या निकालाची उत्सुकता जिल्ह्यातील नेत्यांसह शरद पवार, अजित पवार यांना देखील लागली होती. या अटीतटीच्या निवडणुकीत आमदार शिंदे यांचा केवळ एका मताने निसटता पराभव झाला असल्याने राष्ट्रवादी पक्षांसह सहकार पॅनेलला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा: सहकार, गृहराज्यमंत्र्यांसह आमदार शिंदेंचा आज फैसला

loading image
go to top