
शुक्रवारी (ता.25) नाताळ सण असल्याने शासकीय सुट्टी आहे. बँकांनाही या दिवशी सुट्टी जाहीर आहे. त्यानंतर चौथा शनिवार व रविवार, अशा शासकीय सुट्या आहेत.
अमरावती : या आठवड्यात तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने आर्थिक व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता आहे. सोबतच शासकीय कार्यालयांनाही सुट्ट्या आल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार असला तरी चाकरमान्यांसाठी हा बोनस ठरणार आहे.
हेही वाचा - बाजारात स्टूल टाकून रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी वसंतदादा पाटलांनाच दिला होता धक्का
शुक्रवारी (ता.25) नाताळ सण असल्याने शासकीय सुट्टी आहे. बँकांनाही या दिवशी सुट्टी जाहीर आहे. त्यानंतर चौथा शनिवार व रविवार, अशा शासकीय सुट्या आहेत. बँकांना या सर्व सुट्ट्या लागू असल्याने सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार आजच करावे लागणार आहेत. या सुट्ट्यांचा सर्वाधिक फटका व्यापारी व व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे. त्यांची आज चांगलीच तारांबळ उडणार आहे.
हेही वाचा - Video : टार्गेट २०२१ : नये सालमें कुछ अच्छा होगा!...
शुक्रवार ते रविवार, अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने चाकरमानी मात्र आनंदात आहेत. नाताळ असल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सुट्यांमधील बेत आखण्यास सुरुवात झाली असून त्याचे दृश्य परिणाम गुरुवारी सायंकाळपासूनच दिसणार आहेत.