esakal | कर्जमाफी सवलतीवरून बँका संभ्रमात; शेतकरी वर्गही गोंधळात 
sakal

बोलून बातमी शोधा

bank

राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्ज परतफेडीला दिलेल्या मुदतवाढीत कर्जमाफीची ५० हजार रुपयांची सवलत मिळणार की नाही, याबाबत खुद्द बँकाच संभ्रमात पडल्या आहेत.

कर्जमाफी सवलतीवरून बँका संभ्रमात; शेतकरी वर्गही गोंधळात 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्ज परतफेडीला दिलेल्या मुदतवाढीत कर्जमाफीची ५० हजार रुपयांची सवलत मिळणार की नाही, याबाबत खुद्द बँकाच संभ्रमात पडल्या आहेत. याबाबत राज्य सरकार किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेनेही समाधानकारक स्पष्टीकरण दिलेले नाही. याबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोमवारी (ता. 30) रिझर्व्ह बॅंकेकडे मार्गदर्शन मागविले असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली आहे. शिवाय दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची सवलत जाहीर करण्यात आलेली आहे. या घोषणेनुसार सवलतीच्या रकमेचा फरक एप्रिल आणि मे महिन्यात संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करू, असे आश्र्वासन सरकारने दिले आहे. मात्र, याचा लाभ मिळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत कर्ज रकमेचा फरक भरणे आवश्यक असल्याचे याआधी जाहीर केले आहे. 

दरम्यान, देशात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला. याला प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. यानुसार कर्जाच्या परतफेडीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ संपण्याआधीच सवलत मिळणारी ५० हजार रुपयांची रक्कम खात्यावर जमा केली जाणार आहे. या कालावधीत मुदतवाढ मिळाल्याने कर्जाची परतफेड न केलेले शेतकरी थकबाकीदार दिसू शकतात. परिणामी, या 50 हजार रुपयांच्या सवलतीपासून मुकावे लागणार असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे याबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी पुणे जिल्हा बॅंकेच्या वतीने करण्यात आली आहे. 

loading image