Baramati Election: मोरेंना मैदानात उतरवून काँग्रेसला काय साधायचंय? महत्त्वाची 5 कारणं समजून घ्या...

Why Congress Fielding Akash More Against Sunetra Pawar: आकाश मोरेंनाच संधी का? तर तरुण चेहरा आणि स्थानिक राजकारणात अनुभव असलेलं युवा नेतृत्व म्हणून त्यांनाच पुन्हा संधी दिल्याची चर्चा आहे.
Baramati By-Election Showdown

Baramati By-Election Showdown

esakal

Updated on

Baramati Congress Candidate: बारामती विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, महाविकासआघाडीतील एक घटक पक्ष असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही बारामतीत विरोधी उमेदवार द्यायचा नाही असं ठरवलंय. ठाकरेंनीही सुनेत्रा पवारांनाच साथ दिली आहे. पण काँग्रेस पक्षानं मात्र वेगळीच भूमिका घेतलेली दिसतंय. काँग्रेस पक्षानं इथून आकाश मोरेंना बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आकाश मोरे नेमके कोण आहेत? काँग्रेसला यातून काय साध्य करायचंय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com