
Baramati crime News: बारामतीत टग्यांचा बाजार! महाविद्यालयीन तरूणाला लुटलं नंतर काढले नग्न फोटो
Baramati crime: पवारांची बारामती म्हणून ओळख असणाऱ्या बारामतीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. खून, गोळीबार, चोरी, असे गुन्हे बारामतीत सातत्याने घडत आहेत. त्यातच 4 डिसेंबर रोजी रात्री बारामती मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयील विद्यार्थ्याला मारहाण करत अज्ञातांनी त्याच्या खिशातील 15 हजार रुपयांची रक्कम लुटली आणि जबर मारहाण केली.
आरोपी इतक्यावर थांबले नाहीत तर त्यांनी विद्यार्थ्यांला नग्न करून त्याचे नग्नावस्थेत फोटो काढले. ही घटना 4 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान घडली हा विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहे. तो बारामतीमधील पेन्सील चौकातील सुभद्रा मॉलमधून खरेदी करून होस्टेलच्या दिशेने चालला होता. मात्र वाटेतचं त्याला अडवले आणि त्याच्याकडून बळजबरीने 15 हजार रुपये काढून घेतले.
हेही वाचा: Monetary Policy: गृहकर्ज महागणार सर्वसामान्यांना धक्का! रेपो दरात केली इतकी वाढ
हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
त्यानंतर विद्यार्थ्यांला गाडीवर बसवून शेजारच्या शेतात नेले आणि मारहाण केली. मारहाण केल्यानंतर विद्यार्थ्यांला एटीएममध्ये घेवून जात त्याच्या खात्यातील 15 हजार रूपये अज्ञात इसमानी काढून घेतले आणि तेथून त्यांनी पळ काढला. विद्यार्थ्यांने अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बारामती तालुका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे.
बारामतीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बारामतीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, गेल्या महिन्यात भिगवण रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपावर एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला होता. तर त्यानंतर काही भागातून दोन चाकी गाड्या चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे. मात्र याकडे पोलिस प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. असं स्थानिकांचं मत आहे.