Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

''यांना मी जिल्हा परिषदेची तिकीटं दिली. साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको. मी त्यांचं ऐकलं नाही आणि तिकीट दिलं. नंतर म्हणाले, मला हडपसरची उमेदवारी द्या. परंतु मी त्यांना कर्जत-जामखेडची उमेदवारी दिली.आज तुम्ही माझ्यावर टीका करता...''
Ajit Pawar
Ajit Pawar esakal

Baramati Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापूर्वी रविवारी सायंकाळी ५ वाचता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्या अनुषंगाने बारामतीमध्ये अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटांच्या प्रचारसभा पार पडल्या.

शरद पवारांच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे मंचावर उपस्थित असलेले सगळेच गलबलून गेले. मात्र दुसरीकडे सुरु असलेल्या सभेत अजित पवारांनी रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल करत असली नौटंकी चालणार नाही, असं म्हटलं.

रोहित पवारांना अश्रू अनावर...

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, जेव्हा पक्ष फुटला तेव्हा मी आणि काही पदाधिकारी साहेबांसोबत बसलो होतो. साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो. ते टीव्हीकडे बघत होते. त्यांनी चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही. त्यांना आम्ही काही प्रश्न विचारले त्यांनी उत्तरं दिली. बाहेर जाताना त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हा आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. तो घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढीला ताकद द्यायची आहे. जोपर्यंत नवी पिढी जबाबदारी घेण्याच्या पातळीची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते.

असं म्हणताच रोहित पवारांना स्टेजवर अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. डोळ्यात पाणी आलेले असताना रोहित पवार समोर बसलेल्या शरद पवारांना उद्देशून म्हणाले की, साहेब तुम्हाला विनंती करतो की, हे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून पुन्हा करू नका. तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात. जे लोकं तुम्हाला त्रास देतात, ते मोठे नेते काहीही बोलले तरी सामान्य जनता आणि पवार कुटुंब तुमच्याबरोबर आहे, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

Ajit Pawar
LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

अजित पवारांनी केली नक्कल

दुसरीकडे अजित पवारांनी रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल केली. अजित पवार जाहीर सभेत बोलताना म्हणाले की, आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं.. मी पण दाखवतो.. (नक्कल करत) मला मत द्या, मला मत द्या.. अरे काये? हे बघा असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही काम दाखवा, खणखणीत नाणं दाखवा.. हा झाला रडीचा डाव. हे असलं नाही चालत. मी आधीच सांगितलं होतं, काही जणं असं करणार.

यांना (रोहित पवार) मी जिल्हा परिषदेची तिकीटं दिली. साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको. मी त्यांचं ऐकलं नाही आणि तिकीट दिलं. नंतर म्हणाले, मला हडपसरची उमेदवारी द्या. परंतु मी त्यांना कर्जत-जामखेडची उमेदवारी दिली.आज तुम्ही माझ्यावर टीका करता. तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत. मुलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर भावनिक होऊन चालणार नाही, असा दम अजित पवारांनी भरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com