
बारामती: ओबीसी समाजाच्या वाट्याच आरक्षण कोणालाही घेऊ दिले जाणार नाही, या आरक्षणावर कोणालाही गदा आणू दिली जाणार नाही, ओबीसी समाजबांधव हा डाव कधीच यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असा इशारा ओबीसी बांधवांनी बारामतीत शुक्रवारी (ता. 5) दिला. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशीही मागणी या मोर्चादरम्यान नेत्यांनी केली.