बार्शीचा पैलवान मनोज माने म्हणतो, महाराष्ट्र केसरी जिंकणारच! | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बार्शीचा पैलवान मनोज माने म्हणतो, 'महाराष्ट्र केसरी' जिंकणारच!
बार्शीचा पैलवान मनोज माने म्हणतो, महाराष्ट्र केसरी जिंकणारच!

बार्शीचा पैलवान मनोज माने म्हणतो, 'महाराष्ट्र केसरी' जिंकणारच!

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : घरातील परिस्थिती बेताचीच, तीन एकर कोरडवाहू शेती, वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजंदारीने कामावर जातात; पण जिद्दीने बार्शी (Barshi), कुर्डुवाडी (Kurduwadi) येथे कुस्तीचे (Wrestling) धडे घेऊन आगळगाव (ता. बार्शी) येथील सुपुत्र मनोज पांडुरंग माने याची 92 किलो वजन गटातील माती गटातून महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेसाठी निवड झाली असून, महाराष्ट्र केसरी जिंकणारच, असा चंग मनोजने बांधला आहे. बार्शी तालुक्‍यातून त्याची निवड झाल्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा: ST कर्मचाऱ्यांना 150 कोटी वाढीव वेतन! संप मिटवण्यासाठी तीन पर्याय

मनोजचे आजोबा लालासाहेब दामोदर माने, वडील पांडुरंग माने कुस्तीमध्ये पारंगत होते. पण त्यांना यश मिळाले नाही. मनोजने त्यांचे अनुभव व आपल्या कुटुंबाचा कुस्तीमध्ये नावलौकिक व्हावा यासाठी लहानपणापासूनच कुस्तीचे धडे घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीपासूनच महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकावी, अशी कुटुंबातील व्यक्तींनी मनामध्ये जिद्द ठेवली होती व ध्यास घेतलेला आहे, असे मनोजने सांगितले.

परिस्थिती बिकट असतानाही मनोजने दहावीपर्यंत आगळगाव येथे शिक्षण घेतले असून, सध्या मनोजने अकरावीसाठी बार्शीत बाहेरून प्रवेश घेतला आहे. दोन वर्षे आगळगाव व बार्शी येथे पैलवान गणेश डमरे, बळिराम जाधव, किरण माने, फिरोज मुजावर यांच्याकडे कुस्तीचे धडे घेतले आहेत. वडील पांडुरंग माने मनोजला कोणत्याही परिस्थितीत काहीही कमी पडू देत नाहीत.

हेही वाचा: 'डब्ल्यूआयटी'च्या 485 विद्यार्थ्यांचे एकाचवेळी प्लेसमेंट!

पांडुरंग माने यांच्या कुटुंबात पत्नी सरस्वती, एक मुलगा पैलवान मनोज तर दुसरा मुलगा कुरियर सेवेमध्ये बार्शी शहरात काम करतो. सध्या मनोज शिवराय संकुल कुर्डुवाडी येथे कुस्तीचे धडे घेत असून, वस्ताद अस्लम काझी यांच्या नेतृत्वाखाली तो महाराष्ट्र केसरी लढणार आहे. संपूर्ण राज्यात शंभरपेक्षा अधिक कुस्ती स्पर्धेत मनोजने भाग घेतला असून, जिंकल्यादेखील आहेत. मळेगाव येथील कुस्ती स्पर्धेत नागनाथ केसरी, आगळगाव येथील अभिमन्यू केसरी तर बार्शी येथील भगवंत मैदानावर झालेल्या कुस्ती स्पर्धेत चषक पटकावला होता, असे मनोजने मानेने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

loading image
go to top