Barsu Refinery Project: बारसू रिफायनरीवरुन फडणवीसांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंचा पलटवार

Barsu Refinery Project: बारसू रिफायनरीवरुन फडणवीसांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंचा पलटवार

Barsu Refinery Project:  बारसू रिफायनरीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप केला आहे. बारसूतील आंदोलकांना बंगळुरुतून फंडिंग होत होते. आपण उशीर केल्याने सरकारी कंपन्यासोबत जी कंपनी येणार होती तिने पाकिस्तानमध्ये गुंतवणूक केली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

पाकिस्तानला या कंपनीचा फायदा मिळणार आहेत. तरी आपल्या सरकारी कंपन्या ही रिफायनरी करणार आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.  

ही रिफायनरी महाराष्ट्राच्या हीताची आहे. ज्या माणसांना महाराष्ट्राचा विकास नको आहे. तीच माणसे आपल्यालाला बारसू आंदोलनात दिसली, तीच माणेस आरे, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात दिसली. ही माणसे नर्मदेच्या आंदोलनात देखील होती. यांचे रेकॉर्ड तपासले तर ही माणसे नेहमी बंगळुरुला जातात. यांचे अकाऊंट तपासले तर यांना  बंगळुरुवरुन पैसे येतात, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. Barsu Refinery Project

Barsu Refinery Project: बारसू रिफायनरीवरुन फडणवीसांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंचा पलटवार
Rahul Gandhi: 'मोदीं'बद्दलचं विधान, शिक्षा अन् दिलासा; राहुल गांधींसोबत १३४ दिवसांमध्ये नक्की काय काय घडलं?

यावर आदित्य ठाकरे आक्रमक झाले. "मी पर्यावरणवादी आहे. जिथे जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होईल तिथे आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्ही पुढचा विचार करतो. काही राजकीय पक्ष ५० वर्षापूर्वी काय झालं यातच आपल्या अडकवून ठेवतात. पण जोशी मठमध्ये काय झालं?, हे आपल्याला सांगणार नाहीत. यांचा विकास पोकळ आहे."

नितेश राणे यांच्या टिकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, "मी यांना किमंत देत नाही. महत्वाची गोष्ट आहे की आपल्या देशात वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. हे देशाच्या सैन्यावर संशय घेत आहेत. हे घाणेरडे आरोप लावत आहेत. केंद्रीय संस्थांचा वापर करतात. त्यांना आपल्या देशाचा पाकिस्तान बनवायचा आहे. आम्ही त्यांना तो बनवू देणार नाही."

Barsu Refinery Project: बारसू रिफायनरीवरुन फडणवीसांचा गंभीर आरोप, आदित्य ठाकरेंचा पलटवार
Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल! कोण आहेत ते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com