शेती असो की घराची खरेदी-विक्री रजिस्ट्रीशिवाय अपूर्णच; साठेखत सुरक्षित; खरेदीनंतर मिळणारी स्लीप जपून ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Exclusive
शेती असो की घराची खरेदी-विक्री रजिस्ट्रीशिवाय अपूर्णच; साठेखत सुरक्षित; खरेदीनंतर मिळणारी स्लीप जपून ठेवा

शेती असो की घराची खरेदी-विक्री रजिस्ट्रीशिवाय अपूर्णच; साठेखत सुरक्षित; खरेदीनंतर मिळणारी स्लीप जपून ठेवा

सर्वप्रथम, जमीन खरेदीदार आणि विक्रेत्याने परस्पर संमतीने डीड (दस्त) तयार करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर या दस्ताच्या आधारे ऑनलाइन नोंदणी केली जाते. ज्या जमिनीसाठी नोंदणी केली जाते, त्याची कागदपत्रे आणि खरेदीदार-विक्रेत्याचे फोटो ऑनलाइन अपलोड केले जातात. त्यानंतर एक नोंदणी क्रमांक मिळतो.

रजिस्ट्री म्हणजे काय?

‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’तूनही मालमत्ता हस्तांतरण

मालमत्ता खरेदीची (नोंदणी) प्रक्रिया

सर्वप्रथम, मालमत्ता किंवा जमिनीचे बाजार मूल्य निश्चित केले जाते. यानंतर स्टॅम्प पेपरची खरेदी केली जाते. रजिस्ट्रीपूर्वी, केवळ या स्टॅम्प पेपरवर डीड (दस्त) टाइप केली जाते. मुद्रांक शुल्क जमिनीच्या मालकांसाठी मालकीचा पुरावा म्हणून काम करते. करारादरम्यान, जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी सध्याच्या मालकाची आणि जमीन खरेदी केलेल्या व्यक्तीची सर्व माहिती नोंदविली जाते. त्यानंतर नोंदणी होऊन त्या क्रमांकाद्वारे निबंधक कार्यालयातून नोंदणी होते. रजिस्ट्रीमध्ये दोन साक्षीदारांचीही गरज लागते. ज्यांचा फोटो, ओळखपत्र व स्वाक्षरीचा समावेश करारात होतो. जमिनीशी संबंधित आवश्यक कागदपत्रांसह दोन्ही पक्षांची ओळखपत्रेही द्यावी लागते. रजिस्ट्री झाल्यानंतर रजिस्ट्रार कार्यालयातून एक स्लीप मिळते. ती स्लीप नेहमी जपून ठेवा. स्लीप म्हणजे खरेदी केलेल्या जमिनीचे मालकी हक्क खरेदीदाराला मिळतो. त्यानंतर तो दस्त घेऊन संबंधित तलाठ्याकडे जावे लागते. त्याठिकाणी खरेदीदाराचे नाव सातबाऱ्यावर चढवले जाते.

आधारकार्डवरून ओळख पटल्यास साक्षीदारांची गरज नाही