श्रीकांत शिंदेंमुळे 'अच्छे दिन येणारच; जलील यांचा शिंदे पिता-पुत्रावर कौतुकाचा वर्षाव

Srikant Shinde and imtiaz jaleel
Srikant Shinde and imtiaz jaleel

मुंबई - सध्या महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने निघालं हे कोणालाच सांगता येणार नाही. काही महिन्यांपूर्वी एमआयएमचे संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीशी जवळीक साधल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट खासदार जलील यांच्यासोबत स्टेज शेअर केलं. (Shrikant Shinde news in Marathi)

Srikant Shinde and imtiaz jaleel
Sanjay Raut: 'भारत जोडो यात्रे'त सामील होणार राऊत? सुटकेनंतर काँग्रेसकडूनही स्वागत

खासदार श्रीकांत शिंदे दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात शिंदे यांनी सिल्लोडला सभा घेतली. शिवाय इम्तियाज जलील यांच्या खासदार चषक कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी जलील यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांचे तोंडभरून कौतुक केले.

जलील म्हणाले की, श्रीकांत शिंदे आणि त्यांचे वडील एकनाथ शिंदे हे दोघे पिता-पुत्र आपल्या शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी एकदा शब्द दिला की ते पलटत नाही. काही वर्षांपूर्वी ऐकलं होतं की, अच्छे दिन आनेवाले है. श्रीकांत शिंदे यांच्यासारख्या तरुण नेत्याला पाहिलं की, अच्छे दिन नक्कीच येणार यावर विश्वास बसतो, असंही जलील म्हणाले.

Srikant Shinde and imtiaz jaleel
50 खोक्यांचा आरोप करणाऱ्या रवी राणांना आत टाकणार का? शिवसेनेचा सवाल

दरम्यान श्रीकांत शिंदे आणि जलील यांच्या या जुगलबंदीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. जलील सत्ताधारी शिंदे गटासोबत जवळीक तर साधत नाही ना, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com