धक्कादायक! बीडमध्ये पुन्हा एका पत्नीने पतीचा गळा आवळला; दोन दिवसांत दोन घटना उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Crime

धक्कादायक! बीडमध्ये पुन्हा एका पत्नीने पतीचा गळा आवळला; दोन दिवसांत दोन घटना उघड

बीडः काल बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये पत्नीने पती आवडत नसल्याने त्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघड झाला होता. आज पुन्हा परळी तालुक्यात अशीच घटना घडली आहे. दोरीने पतीचा गळा आवळून त्याचा खून करण्यात आला.

दुसरी घटना बीडच्या परळी तालुक्यातील हिवरा येथे घडली आहे. हनुमान ऊर्फ राजाभाऊ अशोक काकडे (वय ३०) याचे त्याची पत्नी वैष्णवी हिच्यासोबत जोरदार भांडण झाले. ११ नोव्हेंबर रोजी त्यांच्या भांडण झाले. रात्री केव्हातरी वैष्णवीने खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला आणि पती हनुमानचा गळा दोरीने आवळला.

हेही वाचा: मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

या घटनेचा आळ आपल्यावर येऊ नये यासाठी वैष्णवीने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. छताला दोरी अडकवून दरवाजा उघडला आणि बाहेर येत पतीने जीव दिल्याचं सांगितलं. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये हनुमानचा गळा दाबल्याचं आढळून आलं. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad: एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता... जितेंद्र आव्हाड भावनिक

गेवराईतही पत्नीने पतीला गळा आवळला

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथेही अशीच घटना घडली आहे. पांडुरंग चव्हाण यांचं शितल नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं. परंतु लग्न झाल्यापासून शितल पतीला कायम धुसफूस करायची. तू मला आवडत नाही, असं म्हणायची. एकेदिवशी त्याचा मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्यूमुळे नातेवाईकही संतप्त झाले होते. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. पती आवडत नसल्याने शितलनेच पतीचा गळा आवळून खून केल्याचं स्पष्ट झालंय. पत्नीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. गेवराई पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरणी शितलविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पांडुरंग चव्हाणच्या आईने याबाबतची तक्रार दिली होती. त्यानंतरच हा प्रकार उघड झाला.

टॅग्स :Beedcrime