

Interstate Car Racket Busted in Bheed
Sakal
नितीन चव्हाण
बीड : ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कार भाड्याने घ्यायची आणि तिची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करायची, इतकेच नाही तर विक्री केलेली कार पुन्हा चोरून न्यायची… अशा एका अतिशय चतूर आणि हायटेक आंतरराज्य टोळीचा पेठ बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हैद्राबाद ते नांदेड असा धागादोरा शोधत पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून या कारवाईमुळे वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.