
बीड जिल्ह्यात बालविवाहाबाबत धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या प्रजनन व बाल आरोग्य पोर्टलवरील नोंदीनुसार गेल्या वर्षभरात १८ वर्षांखालील १२ मुली गर्भवती झाल्याचं आढळलंय. तर तब्बल ११ मुलींची प्रसूती झाली असून त्यांचे वय १३ ते १७ वर्षे इतकं आहे. बीड, गेवराई, वडवणी, आष्टी, केज, धारूर, शिरूरकासार या तालुक्यांतील घटना यामध्ये समाविष्ट आहेत.