
बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. बीडमधीड शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात कालच दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. रणजित कासलेला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली आहे. न्यायालयाने दोन दिवसांसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे.