
Beed Latest News: बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील चिखली येथील मनोहर कचरू वारे यांचा मुलगा सांप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी बीडच्या तपभूमी वारकरी शिक्षण संस्थेत शिकण्यासाठी पाठवण्यात आला होता. त्यासाठी ५० हजार रुपये डोनेशनची मागणी संस्थेच्या सत्यवान महाराज लाटे यांनी केली. त्यापैकी 30 हजार रुपये मनोहर कचरू वारे यांनी दिले होते मात्र, मुलाच्या काही अडचणीमुळे ऍडमिशन कॅन्सल झाल्यामुळे पैसे वापस मागितले होते.