Indurikar Maharaj: मानधन घेऊनही इंदुरीकर महाराज गायब; संतप्त ग्रामस्थ थेट पोलिसांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indurikar Maharaj
Indurikar Maharaj: मानधन घेऊनही इंदुरीकर महाराज गायब; संतप्त ग्रामस्थ थेट पोलिसांत

Indurikar Maharaj: मानधन घेऊनही इंदुरीकर महाराज गायब; संतप्त ग्रामस्थ थेट पोलिसांत

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात बीडमधल्या ग्रामस्थांमध्ये काल संतापाची लाट उमटल्याचं दिसून आलं. या ग्रामस्थांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे. बीडमधल्या कळसंब इथं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. (Indurikar Maharaj)

झी २४ तासने दिलेल्या वृत्तानुसार, कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचं कीर्तन काल बीडमधल्या कळसंब या गावात आयोजित करण्यात आलं होतं. ग्रामस्थांनी कीर्तनाचं मानधनही इंदुरीकर महाराजांना दिलं होतं. शिवाय या कीर्तनासाठी पंचक्रोशीतून लोक गावांत जमा झाले होते. मात्र इंदुरीकर महाराजांनी ऐनवेळी कीर्तन रद्द केलं. यामुळे नागरिक चांगलेच संतापले.

आयोजकांनी सर्वच तयारी पूर्ण केली होती. मात्र अचानक इंदुरीकर महाराज येणार नाहीत, असं कळलं आणि ग्रामस्थांचा संताप झाला. आपली फसवणूक झाल्याची या ग्रामस्थांची भावना झाली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट पोलिसांत धाव घेतली. मात्र काही स्थानिक कीर्तनकारांनी समजूत घातल्याने ग्रामस्थांचा संताप थोडा थंडावला. त्यामुळे काही काळासाठी तरी इंदुरीकर महाराजांवरचं संकट टळलं आहे.

टॅग्स :Indurikar MaharajBeed