
Mahadev Munde: परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणी आता मोठे खुलासे झाले आहेत. महादेव मुंडे यांच्या हत्येला दीड वर्षांपेक्षा अधिक काळ झाला तरी अद्याप मारेकऱ्यांना अटक झालेली नाही. महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून ९ पानांच्या या अहवालात किती क्रूर हत्या केली होती याची खुलासा झालाय. गळ्यावर २० सेंटीमीटर लांब आणि खोल वार केले होते. शरीरावर एकूण १६ वार केल्याचं आढळून आलं आहे.