
Chhagan Bhujbal Roars in Beed: 'OBC DNA' Claimants Betrayed OBCs with Kunbi GR.
Sakal
बीड : ‘‘ओबीसीं’च्या न्याय्य हक्कांच्या लढाईची मशाल क्रांतिकारी बीड जिल्ह्यातून प्रज्वलित करण्यात आली आहे. आता आपल्या ताटातील कुणाला द्यायचे नाही, यासाठी ओबीसी एकजूट होणे गरजेचे आहे. आपल्यातील वादविवाद दूर करून आपल्यात घुसखोरी करणाऱ्या बोगस कुणबी मराठ्यांना ‘ओबीसी’ आरक्षणातून हद्दपार करण्यासाठी ही लढाई आहे. ‘ओबीसी डीएनए’ म्हणणाऱ्याकडूनच दगाफटका झाला आहे,’’ असा घणाघाती आरोप ‘ओबीसीं’चे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला.