esakal | मराठी माणसाच्या पराभवानंतर जल्लोष करताना लाज वाटली पाहिजे - संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत

'मराठी माणसाच्या पराभवानंतर जल्लोष करताना लाज वाटली पाहिजे'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भाजप'ने एकमताने बेळगाव महापालिकेवर विजयाचा झेंडा फडकवला असल्याचे स्पष्ट झाले आहे.या निकालानंतर संजय राऊत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर टीका केली. बेळगावचा निकाल अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. येत्या काही दिवसात आपण बेळगावचा दौरा करणार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी भाजपने केलेल्या विजयाच्या आनंदोत्सवावर टीका केली आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांच्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं. बेळगावात मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी मोठं कटकारस्थान रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मराठी माणसाच्या पराभवानंतर पेढे वाटणाऱ्यांना लाज वाटत नाही का? असा प्रश्नही राऊतांनी विचारला.

हेही वाचा: सरकारसोबत आम्हाला संघर्ष नकोय; केंद्राला SC ने फटकारले

इतका नालायकपणा इतिहासात झाला नव्हता. महाराष्ट्रात याची वेदना आहे, सातारा, सांगली कोल्हापूरातून फोन येतात. मराठी माणूस हरवला गेला. मराठी माणसाचा पराभव झाला. जे पेढे वाटतायत त्यांना मराठी माणूस माफ करणार नाही असेही संजय राऊत म्हणाले.

मराठी माणूस हरल्याबद्दल पेढे वाटताय त्याची लाज वाटत नाही का असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. राजकारण बाजूला ठेवा, असा जल्लोष करताना लाज वाटली पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.

loading image
go to top