Belgaum : शहरवासीयांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरणा सुरू

हेस्कॉम प्रशासनाची माहिती; ग्रामीण भागातील ग्राहकांना सेवेची प्रतीक्षा
Belgaum
Belgaumesakal

बेळगाव : ‘हेस्कॉम’ची डिजिटल पेमेंट सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन बिल भरणाऱ्या शहरातील ग्राहकांना चांगली सुविधा निर्माण झाली आहे. मात्र, ग्रामीण भागात डिजिटल पेमेंटची सुविधा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन सेवेसाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Belgaum
Astro Tips : हाताची बोटे अशी असणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका असतो अधिक, वेळीच काळजी घ्या!

डिजिटल पेमेंटसाठी नवीन सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती देत गेल्या काही दिवसांपासून ‘हेस्कॉम’ने ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा काही दिवस बंद ठेवली होती. त्यामुळे विजेचे बिल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना तासनतास रांगेत थांबावे लागत होते. गेल्या काही दिवसांपासून सरकारने घरगुती वीज वापरासाठी २०० युनिट पर्यंतचे बिल माफ केले आहे. त्यामुळे बिल भरणा केंद्रात येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, इतर व्यावसायिक आणि नागरिकांना बिल भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा फायदेशीरठरणार आहे.

Belgaum
Astro Tips : उशाखाली एक रूपयाचे नाणे ठेवल्याने आर्थिक परिस्थिती सुधरेल का? वाचा काय म्हणतं ज्योतिषशास्त्र

अनेक दिवस सेवा बंद असल्याने ऑनलाईन सेवा कधी सुरू होणार, याची विचारणा सातत्याने ग्राहकांकडून हेस्कॉमकडे केली जात होती. तांत्रिक कारण असल्याचे कारण देत अनेक दिवस सेवा बंद ठेवण्यात आली होती. आता ‘हेस्कॉम’ने पत्रक जाहीर करत पुन्हा ‘ऑनलाईन’ सेवा सुरू झाल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार भारत बिल पावती ऑपरेटिंग युनिट सेवेचा वापर करून ग्राहकांना गुगल पे, फोन पे, पेटीएम आदी ऑनलाईन सुविधांचा वापर करून बिल भरता येणार आहे. त्यामुळे शहरातील ग्राहकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Belgaum
Career Tips : जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत

शहरवासीयांना विजेचे बिल भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली असली, तरी अजूनही ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ही सेवा सुरळीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजधारकांची मोठी अडचण होणार आहे. याची दखल घेत ग्रामीण भागातील सुविधा देखील लवकर सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

गुरुवारपासून डिजिटल पेमेंट सुविधा पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची सोय होणार असून, वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून शहरातील ग्राहक विजेचे बिल अदा करू शकतात. ऑनलाईन पेमेंटबाबत काही तक्रारी असल्यास त्याचेही प्रशासनामार्फत निवारण केले जाणार आहे.

- अश्विन शिंदे, शहर अभियंता (प्रभारी) हेस्कॉम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com