Astro Tips : हाताची बोटे अशी असणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका असतो अधिक, वेळीच काळजी घ्या!

जाड बोटे असलेले लोक सतत आजारी असतात
Astro Tips
Astro Tips esakal

Astro Tips :

माणसाच्या शरीराचा आकार, चेहऱ्याची कोरीवता, शरीरावर असलेले तीळ व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याबद्दल अनेक संकेत देत असते. शरीराची रचना, आकार, रूप आणि रंग आपल्या व्यक्तिमत्त्वाची माहिती देतात. तुम्ही पूर्वजांकडून ऐकले असेल की, गालावर तीळ असलेली, लांब हात असलेली व्यक्ती नशीबवान असते.

लांब नखे असलेली व्यक्ती हुशार असते, इत्यादी. शरीराच्या सर्व भागांमध्ये बोटे देखील महत्वाची भूमिका बजावतात. बोटांच्या संरचनेच्या आधारे, एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात आणि त्याचे व्यक्तिमत्त्व कोणत्या प्रकारचे आहे हे आपण जाणून घेऊ शकतो.

Astro Tips
Astro Tips : दिवाळीत होणार दुर्लभ योग, या चार राशींच नशीब पालटणार, होणार धनलाभ अन् परदेशस्वारीचं गिफ्ट

ज्योतिषशास्त्रात अनेक गोष्टी आहेत. त्यापैकीच एक आहे आपले हात पाहून भविष्य जाणणारी विद्या होय. केवळ हातांच्या रेषाच नाही तर हातांचा आकार, बोटांची रचना यावरूनही आपल्या आरोग्य, आर्थिक गोष्टींविषयी अनेक गोष्टी जाणून घेऊ शकतो.

ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास केला जातो. तर, हस्तरेषा शास्त्रात माणसाच्या हाताचा अभ्यास केला जातो. हातावरील रेषा, हातावरील चढ-उतार, बोटांवरील चिन्हे, हातावरील चिन्हे यांचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्ये, भविष्यातील घटनांचा अंदाज बांधता येऊ शकतो.

Astro Tips
Astro Tips : घरात योग्य दिशेत दिवा लावल्यास उजळेल भाग्य, घरात पैशांच्या भरभराटीसह नांदेल सुखसमृद्धी

सरळ बोटे असलेले हात

सरळ बोटे असलेला हात उत्तम मानला जातो. अशा लोकांना मोठ्या आजारांचा धोका कमी असतो. त्यांच्या कामात कमी अडथळे येतात आणि त्यांना आरोग्य लाभ होतात. तसेच त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीही कमी असतात.

वाकडी बोटे असलेले हात

हाताची वाकडी बोटे सरळ बोटांच्या विरुद्ध परिणाम करतात. परंतु तळहात आणि तळहातावरील रेषा परिपूर्ण असतील तर वाकडी बोटे असलेल्या हातांचे लोक क्रांतीकारी असतात. त्यांचे नशीब चांगले असते. अशा लोकांना गुप्त रोगांचा त्रास होऊ शकतो.

लहान बोटे असलेले हात

काही लोकांचे हात मोठे असतात. पण, हाताची बोटे लहान असतात. असे लोक तापट स्वभावाचे असतात, म्हणूनच त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका असतो. अशा लोकांनी आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला ऍस्ट्रोलॉजिस्ट देतात. ज्यामुळे त्यांना काही गंभीर आजारांपासून

Astro Tips
Healthy Heart Tips :  या लाल फळाशी कराल गट्टी, तर होईल Heart Attack ची सुट्टी!

लांब बोटे असतील तर...

लांब बोटे असणारे लोक आजारांबाबत संवेदनशील असतात, त्यामुळे त्यांना आजार लवकर होतात, ऋतुमानानुसार रोग त्यांच्यावर लवकर परिणाम करतात आणि अशा व्यक्तींनी त्यांच्या खाण्याच्या सवयींची पूर्ण काळजी घ्यावी.

रूंद बोटे असलेले लोक 

जाड बोटे असलेले लोक सतत आजारी असतात. त्यांना काहीवेळा किरकोळ वाटणारे आजारच सतत होतात. पण त्याचा त्रासही जास्त होतो. अशा लोकांना उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि अर्धांगवायूचाही होऊ शकतात. हे लोक अनेकदा दातांच्या समस्यांमुळे त्रस्त असतात.

Astro Tips
Cause Heart Attacks : फोन जास्त वापरल्याने हृदयविकाराचा झटका येतो का? सत्य जाणून घ्या

बारीक बोटे असलेले हात

बारीक बोटे असलेल्या व्यक्तीला कोणताही मोठा किंवा दीर्घकालीन आजार होत नाही, तरीही हे लोक संवेदनशील असतात. यामुळेच जेव्हा जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा त्यांना वातावरणातील बदलामुळे आजारांचा त्रास होतो पण ते काही दिवसांनी बरे होतात.

Astro Tips
Eknath Khadse Heart Attack : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, सुट्टीवर असलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी तात्काळ केली मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com