कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

राज्य सरकारने राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. कर्जमाफीची रक्कम पीककर्जाची असणार आहे. पीककर्ज परतफेडीचा सर्वसाधारण कालावधी ३० जून असतो. त्यापूर्वी कर्जमाफीचे निकष अंतिम होऊन पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Farmer Scheme

Farmer Scheme

ESakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. कर्जमाफीची रक्कम पीककर्जाची असणार आहे. पीककर्ज परतफेडीचा सर्वसाधारण कालावधी ३० जून असतो. त्यापूर्वी कर्जमाफीचे निकष अंतिम होऊन पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे २४ हजार शेतकरी थकबाकीत आहेत. त्यांच्याकडे ३६२ कोटींची थकबाकी आहे. मात्र, त्यात पीककर्जासह दिर्घ व मध्यम मुदतीची रक्कम अधिक आहे. दुसरीकडे ९० हजार शेतकरी नियमित कर्जदार आहेत. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्याकडे बॅंकेचे शेतीसंबंधित कोणतेही कर्ज थकलेले नाही, त्यांनाच ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. मात्र, ५० हजारांपेक्षा कमी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना तेवढे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार का, या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी अधिकाऱ्यांकडे नाही.

पूर्वीच्याच कर्जमाफीचे बहुतेक निकष या कर्जमाफीसाठी असणार आहेत. मात्र, दिर्घकालिन उपाययोजनांच्या अनुषंगाने या कर्जमाफीचे काही विशेष निकष देखील असणार आहेत. पुढील एक-दीड महिन्यात ते निकष जाहीर होतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

...तरच ७/१२ वरील कर्जाचा बोजा कमी

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी दोन लाख रुपयांची असून ती पीककर्जापुरतीच मर्यादित आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन लाखांवरील रक्कम आधी बॅंकेत जमा करावी लागणार आहे. तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज बिनव्याजी मिळत असल्याने चार एकरांवरील बहुतेक शेतकऱ्यांनी तेवढे पीककर्ज घेतले आहे. त्यांना वरील एक लाख रुपये भरावे लागतील, त्यानंतर त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी होणार आहे. दोन लाखांवरील रक्कम न भरल्यास दोन लाखांची कर्जमाफी मिळूनही त्या शेतकऱ्यांमागे बॅंकेचा वसुलीचा ससेमिरा सुरूच राहील.

सरकारला लवकरच पाठविली जाईल पात्र शेतकऱ्यांची माहिती

कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, याची तारीख मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली आहे. आता कर्जमाफीचे निकष काही दिवसांत निश्चित होतील. निकषांनुसार पात्र नियमित व थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारला सादर होईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.

- दिपक तावरे, सहकार आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com