Bhagat Singh Koshyari: भगतसिंह कोश्यारींना हायकोर्टाचा मोठा दिलासा; महापुरुषांचा अनादर करण्याचा हेतू... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 koshyari

Bhagat Singh Koshyari: भगतसिंह कोश्यारींना हायकोर्टाचा मोठा दिलासा; महापुरुषांचा अनादर करण्याचा हेतू...

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा मिळाला आहे. महापुरुषांचा अनादर करण्याचा हेतू कोश्यारी यांचा नव्हता, असी टिप्पणी मुंबई हाय कोर्टाने केली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. (Bhagat Singh Koshyari controversy statement Chhatrapati Shivaji Maharaj High Court Of Bombay )

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालय नुकतीच फेटाळून लावली आहे.

माजी राज्यपाल कोश्यारी यांचा हेतू समाजाचं प्रबोधन करण्याचाच होता, कोणत्याही महान व्यक्तीचा अनादर करण्याचा नव्हता असं निरीक्षण न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अभय वाघवासे यांच्या खंडपीठानं या संदर्भातील याचिका फेटाळताना आपल्या आदेशात नमूद केलं आहे.

राज्यपालांची वक्तव्य ही इतिहासाच्या विश्लेषणात्मक आहेत. ही वक्तव्य राज्यपालांचा सामाजिक दृष्टीकोन दाखवतात. श्रोत्यांनीही समाजाभीमूख दृष्टीकोन आत्मसात करत तो आचरणातही आणावा हाच त्या वक्तव्यांमागचा उद्देश होता.

जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर?

त्यामुळे ही वक्तव्य प्रथमदर्शनी कोणत्याही महापुरुषाचा अवमान करणारी नाहीत. म्हणूनच ही फौजदारी कायद्यानुसार, दखल घेण्यास पात्र ठरत नाहीत, असंही निरीक्षण हायकोर्टानं आपल्या आदेशात नोंदवलं आहे.

टॅग्स :bombay high court