
Political News : महाराष्ट्रात गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद..; जाता जाता काय बोलून गेले कोश्यारी?
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resign) राष्ट्रपतींनी मंजूर केला. रमेश बैस (Ramesh Bais) आता राज्याचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बैस यांची नियुक्ती केलीये.
दरम्यान, राजीनामा स्वीकारल्यानंतर भगतसिंग कोश्यारी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले होते. नवी मुंबईतील उत्तराखंड प्रीमिअर लीगच्या (Uttarakhand Premier League) कार्यक्रमात भगतसिंग कोश्यारी आले होते.

यावेळी कोश्यारींनी भाषणात जोरदार टोलेबाजी केली. महाराष्ट्राचे लोक कसे आहेत? असं मला कुणीतरी विचारलं. मी म्हणालो, ते आमच्या पहाडी लोकांसारखेच आहेत. चांगले लोक आहेत. शहरात असेल गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद असतील, पण ओव्हरऑल चांगली लोक आहेत, असं कोश्यारी म्हणाले.
तुमच्याकडं देशपांडे आहेत, तर आमच्याकडं पांडे आहेत, तुमच्याकडं राऊत आहेत तर आमच्याकडं रावत आहे,' असं म्हणत कोश्यारींनी जाता जाता संजय राऊतांना (Sanjay Raut) टोला हाणला. काफल पिकायला लागलं असेल, एकदा जाऊन खाऊन या. काफल खायला मिळेल, म्हणून मीदेखील चाललोय. उत्तराखंडच्या पहाडी भागामध्ये काफल हे फळ मिळतं, त्याबद्दलच कोश्यारी बोलत होते.