esakal | भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?
sakal

बोलून बातमी शोधा

भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता या पदावर भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंग कोश्यारी यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता या पदावर भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंग कोश्यारी यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

विद्यासागर राव यांनी 2014 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता या पदी उत्तरखंडचे माजी मुख्यमंत्री असलेले कोश्यारी यांची निवड निश्चित मानली जात आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

दरम्यान, यापूर्वी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता त्यांचे नाव मागे पडले असून, कोश्यारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. 

loading image
go to top