
साकोली : शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या १७ वर्षीय मुलीसोबत सोनोग्राफीच्या बहाण्याने डॉक्टरनेच अनैतिक वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यातील पीडिता मुलगी आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती. डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी आई व नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफी रूममध्ये तब्बल अर्धा तास एकांतात अनैतिक कृत्य केले, असा गंभीर आरोप आहे. घडलेली घटना पीडितेने आई-वडिलांना सांगितल्यावर साकोली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून, आरोपी डॉक्टर फरार आहे.