esakal | भारत बायोटेक महाराष्ट्राला देणार ८५ लाख डोस!
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Biotech

सुरवातीला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे लसींच्या पुरवठ्याबाबत विचारणा करण्यात आली होती, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

मोठी बातमी : भारत बायोटेक महाराष्ट्राला देणार ८५ लाख डोस!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीने महाराष्ट्र सरकारला ८५ लाख डोस देण्याची तयारी दर्शवली आहे. येत्या मे महिन्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी भारत बायोटेक मे महिन्यात सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी ५ लाख डोस देणार असून उर्वरित डोस पुढील ६ महिन्यांच्या कालावधीत देणार आहे. यासाठी प्रति डोस ६०० रुपये आणि त्यावर ५ टक्के करही आकारला जाणार आहे.

हेही वाचा: कुणी लस देता का लस? महाराष्ट्र सरकारसमोर प्रश्न

लसींची ऑर्डर राखून ठेवण्यासाठी कंपनीने आगाऊ रक्कम जमा करण्यास सांगितले आहे. सुरवातीला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे लसींच्या पुरवठ्याबाबत विचारणा करण्यात आली होती, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. मे महिन्याच्या मध्यानंतरच पुरवठा करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

भारत बायोटेककडून महाराष्ट्राला मे महिन्यात ५ लाख, जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी दहा लाख तर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी २० लाख डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकूण ८५ लाख डोससाठी महाराष्ट्र सरकारला ५३५.५ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा: अग्रलेख : आयोगाला जेव्हा जाग येते!

दरम्यान, मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, सध्या लस उपलब्ध होणे ही सर्वात मोठी समस्या आहे. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरण करताना लसीच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. लसींसाठी आम्ही कितीही पैसे खर्च करण्यास तयार आहोत, पण लसींचा पुरवठा करणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. पुढील दोन दिवसांत सर्व उपलब्ध पर्यायांचे मूल्यांकन करून मंत्रिमंडळ निर्णय घेईल. आणि मुख्यमंत्री राज्याच्या लसीकरण योजनेबाबतची घोषणा करतील.

हेही वाचा: मृत्यूचे तांडव व अस्पृश्य भारत

महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील लोकांची संख्या जवळपास ५ कोटींच्या घरात आहे. आणि दोन डोससाठी जवळपास १२ कोटी डोसची आवश्यकता महाराष्ट्राला भासणार आहे. सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर ही लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

loading image