
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत बच्चू कडू यांनी राज ठाकरेंना कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. पण या भेटीमुळे एक जुना आणि भन्नाट किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. तुम्हाला माहिती आहे का, की बच्चू कडू यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राज ठाकरेंमुळेच झाली होती? चला, जाणून घेऊया हा रंजक किस्सा!