
मुंबई: पालकमंत्री पदावरून महायुतीत असलेला वाद पुन्हा उफाळून आला आहे. विशेष: रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादीच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आज गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींशी सेटलमेंट केली, असं वक्तव्य केले आहे.