
Anjali Damania Ajit Pawar Meeting Marathi News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व पुरावे आणि कागदपत्रे घेऊन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सुमारे तीस मनिटं त्यांच्यात चर्चा झाली. पण अजित पवारांनी दमानिया यांना काय सांगितलं? या बैठकीत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.