Bharat Jodo Yatra: राष्ट्रगीत लावायला सांगितलं अन् वेगळंच गाणं वाजलं; राहुल गांधींच्या सभेचा Video व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi Washim Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra: राष्ट्रगीत लावायला सांगितलं अन् वेगळंच गाणं वाजलं; राहुल गांधींच्या सभेचा Video व्हायरल

Bharat Jodo Yatra: राष्ट्रगीत लावायला सांगितलं अन् वेगळंच गाणं वाजलं; राहुल गांधींच्या सभेचा Video व्हायरल

भारत जोड़ो यात्रा सध्या महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यात आहे. यावेळी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेते मंचावर होते. यावेळी राष्ट्रगीताऐवजी वेगळंच गाणं लागलं आणि त्यामुळे आता राहुल गांधींवर टीकेला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातल्या वाशिममध्ये भारत जोडो यात्रा आली होती. त्यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेस नेते मंचावर सभा घेत होते. यावेळी राहुल गांधींनी राष्ट्रगीत वाजवायला सांगितलं. मात्र चुकून कोणतंतरी वेगळंच गाणं वाजलं. जवळपास पाच दहा सेकंद राहुल गांधींसह काही नेते सावधान स्थितीत उभे होते. पण जेव्हा चुकीचं गाणं वाजतंय हे लक्षात आलं, राहुल गांधींनी तात्काळ नेत्यांना रोखलं आणि राष्ट्रगीत लावायला सांगितलं.

मात्र या नेत्यांना ही गोष्ट थोड्या उशिरा लक्षात आली, अखेर गाणं बंद करण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपा नेते नितेश राणे यांनी हा व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. यावरुन अनेक नेटकऱ्यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. तसंच काहींनी राहुल गांधींवर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.