Bhaskar Jadhav: राणेंची थट्टा उडवणे भास्कर जाधवांना भोवणार? कुडाळ पोलिसांकडून नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav: राणेंची थट्टा उडवणे भास्कर जाधवांना भोवणार? कुडाळ पोलिसांकडून नोटीस

भाजपा नेते नारायण राणे यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप भास्कर जाधव यांच्यावर केला होता. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात केली.

भास्कर जाधव यांना आता कुडाळ पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कुडाळच्या मोर्चामध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भाजपच्या तक्रारीनंतर भास्कर जाधव यांच्या घरी जाऊन पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.

हेही वाचा: Pune News: भास्कर जाधवांना कोर्टाचा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता जाणून त्वरित आमदार भास्कर जाधव यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दलच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल तातडीने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून सदर प्रकरणी पुढील कारवाई सुरू करण्यात आली होती.

हेही वाचा: Bhaskar Jadhav: राणे पितापुत्रांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; जाधवांवर पुण्यात गुन्हा दाखल