Bhaskar Jadhav: फडणवीस चलाख असल्याचं सांगत भास्कर जाधवांच्या राणा-कडू यांना शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhaskar Jadhav: फडणवीस चलाख असल्याचं सांगत भास्कर जाधवांच्या राणा-कडू यांना शुभेच्छा

Bhaskar Jadhav: फडणवीस चलाख असल्याचं सांगत भास्कर जाधवांच्या राणा-कडू यांना शुभेच्छा

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अपमानास्पद आणि शिरवाळ भाषा वापरुन सामाजिक भावना दुखावल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आला होता. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात जाधवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुडाळमध्ये भाषण करताना जाधव यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. त्यानंतर कुडाळ आणि अन्य ठिकाणीही भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पुणे कोर्टाकडून भास्कर जाधव यांना हंगामी अटकपुर्व जामिन मंजूर मिळाला. त्यानंतर आज भास्कर जाधव यांनी डेक्कन पोलिस ठाण्याला भेट दिली. शिंदे फडणवीस सरकार विरोधी पक्षातील लोकांची कोंडी करत आहेत. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला त्यात काही तथ्य नाही असंही यावेळी भास्कर जाधव म्हणालेत. तर पोलीस दडपणाखाली आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

कायद्याचा सन्मान राखत आज डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिलो. महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे. हे सरकार सगळे नियम पायदळी तुडवत आहेत. मविआ सरकारने चांगले काम करत अनेक प्रकल्प आणले. कोरोना सामना करत काम केलं. मात्र केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचारच झालं मात्र आता मविआ सरकारच्या काळात आलेले अनेक प्रकल्प आता जात आहेत. एकनाथ शिंदे म्हटले माझ्यामागे महाशक्ति आहे पण आता महाराष्ट् खिळखीळ करण्याचं काम सुरू आहे.

पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, देवेंद्र फडणवीस बोलण्यात फार चलाख आहेत. यांच्या मध्यस्थीमुळे रवी राणा बच्चू कडू याचे वाद मिटला त्याचबरोबर रवी राणा बच्चू कडू याचे वाद होत राहो याच शुभेच्छा असंही ते म्हणालेत.

एकनाथ शिंदे गटात जाणार होतात का या प्रश्नावर भास्कर जाधव भडकले

भास्कर जाधव पुण्यात असताना पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला 'तुम्ही एकनाथ शिंदे गटात जाणार होतात पण स्वतः मुख्यमंत्री यांनी तुम्हाला तिथे येण्यास नकार दिला' त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, तुम्ही कधी एकनाथ शिंदेंना भेटला? मला महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्ही भेटत आहात जे हे असं सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांना तुम्ही भेटून आला का? त्यांनी तुम्हाला हे सांगितले का? काय प्रश्न विचारत आहात?