भावना गवळींच्या अडचणीत वाढ? सईद खानला अटक | Maharashtra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhavana gawali

महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये कन्व्हर्ट केल्या प्रकरणी आता सईद खान यांना अटक झाली आहे.

भावना गवळींच्या अडचणीत वाढ? सईद खानला अटक

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये कन्व्हर्ट केल्या प्रकरणी आता सईद खान यांना अटक झाली आहे. सईद खान हे कंपनीचे संचालक आहेत. दरम्यान, यामुळे आता भावना गवळींच्या अडचणी वाढू शकतात.

खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. तसेच बालाजी पार्टीकल बोर्ड या कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खासदार गवळींवर आहेत.

हेही वाचा: शिवसेनेच्या 'या' नेत्यांमागे ED चा ससेमिरा, चार जण चौकशीच्या फेऱ्यात

'ईडी'ने रिसोड व देगाव येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बीएएमएस कॉलेज तसेच रिसोड तालुक्यातील भावना अॅग्रो लिमिटेड या संस्थांशी संबंधित असलेल्या नऊ ठिकाणांवर छापे टाकले होते.

loading image
go to top