esakal | भीमामाईचा उलगडणार प्रवास! अभ्यासासाठी विशेष समिती
sakal

बोलून बातमी शोधा

Bhima River

भीमामाईचा उलगडणार प्रवास! अभ्यासासाठी विशेष समिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पंचवीस धरणे, मुळा-मुठेसह १४ प्रमुख नद्या (River) आणि त्यांच्या उपनद्या, ४५ हजार ३३५ चौरस किलोमीटरचे भौगोलिक क्षेत्र असलेल्या अन्‌ उगमापासून ते कर्नाटकच्या हद्दीपर्यंतच्या भीमा नदीच्या (Bhima River) प्रवासाचा अभ्यास (Study) प्रथमच होणार आहे. त्यासाठी देशपाताळीवरील तज्ज्ञांच्या सहभाग असलेली विशेष समिती राज्य सरकारकडून (State Government) स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून पुणे शहरात येणाऱ्या दरवर्षी येणाऱ्या पुराचा अभ्यास देखील होणार आहे. (Bhma River Journey Special Committee for Study)

Bhima River

Bhima River

दोन वर्षांपूर्वी कृष्णा नदीला आलेल्या पुराने सांगली, कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. हे दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख शहरे दहा दिवस पाण्याखाली होती. या पूरपरिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. या समितीने अभ्यास करून या संदर्भातील उपयोजनांचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्याच धर्तीवर प्रथमच भीमा खोऱ्याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये बारा सदस्यांचा समावेश आहे. जलसंपदा बरोबरच भारतीय हवामान विभागातील तज्ज्ञ, आयआयटी मुंबई, केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था (सीडब्लुपीआरएस), महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर यांच्यासह या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश या समितीमध्ये आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यात दिवसभरात 36 हजार 176 रुग्ण कोरोनामुक्त

पावसाचे प्रमाण जास्त

भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगामध्ये होतो. पुणे शहरापासून प्रामुख्याने वरील बाजूस ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या डोंगरभागात सरासरी ६ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. तर पुणे शहरापासून सोलापूरच्या दिशेने पावसाचे प्रमाण टप्याटप्प्याने कमी होत जाते. साधारणतः ६०० मिलिमीटर, उगमापासून १०० किलोमीटरच्या परिसरात ३५० मिलिमीटर पाऊस पडतो. तर पुढील टप्प्यात पावसाचे प्रमाण कमी होऊन ते २५ मिलिमीटर इतके होते. त्यामुळे पुण्यात अनेकदा पूर येतो, तर पाऊस नसून देखील पंढरपूर आणि परिसरात पूर येतो.

समितीचे कार्यक्षेत्र

भीमा नदी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे उगम पावते. राज्यातील पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यातून वाहत कर्नाटकात तर पुढे आंध्र प्रदेशाच्या हद्दीवर कृष्णा नदीला मिळते. उर्ध्व भीमा खोऱ्याचे राज्यातील भौगोलिक क्षेत्र ४५ हजार ३३५ चौ.किमी आहे. पुणे जिल्ह्यात लहान मोठी अशी एकूण सुमारे २५ धरणे असून या धरणातील पाणी उजनी धरणात एकत्र येते. त्यामुळे मुख्य असलेल्या भीमा नदीबरोबरच तिच्या उपनद्यांचा सुद्धा अभ्यास करण्यात येणार आहे.

भीमानदी आणि खोऱ्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. समितीची नुकतीच बैठक झाली. भीमा नदीला येणारे पूर, या खोऱ्यातील पर्जनमान्य, त्यातून भविष्यात उद्‌भवाणारे संकटे यांचा अभ्यास या समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. भीमा खोऱ्याचा पहिल्यांदाच अशा प्रकारे अभ्यास होणार आहे.

- राजेंद्र पवार, अध्यक्ष, विशेष समिती

हेही वाचा: एमपीएससीने PSI भरतीसंदर्भात घेतला महत्वपूर्ण निर्णय

उर्ध्व भीमा उपखोऱ्याचा भौगोलिक तपशील

पुणे जिल्हा : आंबेगाव, जुन्नर, खेड, हवेली, मावळ, दौंड, बारामती, हवेली, वेल्हे, शिरूर, भोर, मुळशी, पुरंदर, इंदापूर

सातारा जिल्हा : खंडाळा, फलटण, माण

सोलापूर जिल्हा : माळशिरस, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट , बार्शी

नगर जिल्हा : श्रीगोंदा, कर्जत, पारनेर, नगर, जामखेड, पाथर्डी, अकोले

सांगली जिल्हा : जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ