esakal | Corona Update: राज्यात दिवसभरात 36 हजार 176 रुग्ण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

काही दिवसांपूर्वी दररोज 50 हजारांच्या पुढे आढळणारी कोरोना रुग्णसंख्या आता 30 हजारांच्या आत आली आहे

Corona Update: राज्यात दिवसभरात 36 हजार 176 रुग्ण कोरोनामुक्त

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- काही दिवसांपूर्वी दररोज 50 हजारांच्या पुढे आढळणारी कोरोना रुग्णसंख्या आता 30 हजारांच्या आत आली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 24 हजार 136 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 36 हजार 176 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना मृतांच्या संख्येने 90 हजाराचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 601 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत विषाणूने 90 हजार 349 जणांचा बळी घेतलाय. राज्यात एकूण 52 लाख 18 हजार 768 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Maharashtra corona update rajesh tope health ministry active cases)

राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 3,14,368 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाने गती घेतली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलील्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत 2 कोटी 10 लाख 48 हजार 169 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 24 मेला रोजी 2,49,339 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 92.76 पर्यंत गेला आहे.