Shivsena : 'या भ्रष्ट व्यक्तिमत्वाला चांगलेच ओळखून आहोत'; भूषण देसाईंच्या शिवसेना प्रवेशाला भाजपमधून विरोध

bhushan desai join shiv sena shinde faction goregaon bjp local leader opposed it write to cm eknath shinde
bhushan desai join shiv sena shinde faction goregaon bjp local leader opposed it write to cm eknath shinde

ठाकरे गटातील जेष्ठ नेते सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांच्या निष्ठावान सहकाऱ्यांपैकी एक आहेत, मात्र त्यांचे पुत्रे भूषण देसाई यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशानंतर लगेचच या पक्षप्रवेशाला विरोध होताना दिसत आहे. गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना याबद्दल पत्र लिहिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेनानेते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांनी बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत पक्षप्रवेश केला. भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेस झाला तोच गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यबद्दल पत्र लिहिलं.

त्यांनी आम्ही गोरेगावकर या भ्रष्ट व्यक्तिमत्वाला चांगलेच ओळखून आहोत. भ्रष्ट व्यक्तिमत्व असलेल्या नेत्यांच्या मुलांना पक्षांमध्ये प्रवेश न देण्याची मागणी या पत्रातून केली आहे. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

bhushan desai join shiv sena shinde faction goregaon bjp local leader opposed it write to cm eknath shinde
Bhushan Desai News : भूषण देसाईंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश का केला? स्पष्टच सांगितलं कारण…

संदीप जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय? वाचा संदीप जाधव यांचे पत्र जसेच्या तसे..

प्रति

श्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

विषय : भ्रष्ट व्यक्तिमत्व असलेल्या नेत्यांच्या मुलांना पक्षांमध्ये प्रवेश न देण्याबाबत

माननीय मुख्यमंत्री साहेब,

मी भाजपा गोरेगावचा मी विधानसभा उपाध्यक्ष, एक छोटा कार्यकर्ता आहे. आपणास कोणती गोष्ट सुचवावी एवढी माझी राजकीय उंची नाही पण नाईलाजास्तव हे पत्र लिहित आहे. आत्ताच भूषण सुभाष देसाई यांच्या प्रवेशाची बातमी टीव्ही चॅनल वर बघितली. आम्ही गोरेगावकर या भ्रष्ट व्यक्तिमत्वाला चांगलेच ओळखून आहोत तसेच आम्ही प्रथम शिवसेनेत होतो, गेले चार वर्षे भाजपात आहोत.

भूषण सुभाष देसाई हा फक्त आणि फक्त कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच आपल्याकडे आलेले आहेत. आपल्या पक्षाचे तसेच आपली प्रतिमा ही खूप चांगली आहे पण अशा भ्रष्ट आणि मलीन चरित्र्याच्या व्यक्तिमत्त्वाला आपण राजकीय आश्रय दिल्यामुळे गोरेगावकरांमध्ये संतप्त भावना जागल्या आहेत.

आज आपण युतीमध्ये आहोत मित्र पक्षाची एक चूक सुद्धा दोन्ही पक्षास महाग पडू शकते. मी एक छोटा कार्यकर्ता आहे पण आपण या सूचने चा नक्कीच विचार कराल अशी अपेक्षा...

धन्यवाद! आपला नम्र

संदिप जाधव

bhushan desai join shiv sena shinde faction goregaon bjp local leader opposed it write to cm eknath shinde
IND vs AUS : रेकॉर्ड्सचा पाऊस! विराट 40 महिन्यांनंतर ठरला सामनावीर, तर अश्विनने...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com