सोलापूरच्या पोलिस अधीक्षकांची मोठी कारवाई! करमाळा व माढा तालुक्यातील ‘हे’ १७ सराईत गुन्हेगार हद्दपार, वाळू तस्करीसह गंभीर गुन्हे दाखल होते, वाचा....

सोलापूर जिल्ह्यातील शरीर, मालमत्ताविषयक, वाळू तस्करी आणि अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. करमाळा विभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन याच्यासह एकूण १७ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी जयश्री आव्हाड यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत.
solapur sp atul kulkarni

solapur sp atul kulkarni

sakal

Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शरीर, मालमत्ताविषयक, वाळू तस्करी आणि अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. करमाळा विभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन याच्यासह एकूण १७ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी जयश्री आव्हाड यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत.

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध धंदे व सराईत गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने करमाळा, टेंभुर्णी व कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या १७ गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यानुसार त्या सर्वांना सोलापूर, पुणे जिल्हा व सराईत गुन्हेगारांच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित माने, अतुल मोहिते, बाळासाहेब भरणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

‘या’ १७ जणांना केले तडीपार

जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन (रा. वांगी क्र. एक, ता. करमाळा), ओंकार दत्तात्रय गव्हाणे (रा. कुर्डूवाडी), नागेश शंकर लोढे (रा. टेंभुर्णी), करण कृष्णा आलाट (रा. मौलाली माळ, करमाळा), मारूती जनार्धन केचे (रा. आलेगाव बु., ता.माढा), आगतराव लक्ष्मण काळे, रत्नमाला आगतराव काळे, विमल आगतराव काळे (रा. अकोले बु., ता. माढा), हनुमंत बापु महाडीक (रा. मुंगशी, ता. माढा), धीरज अशोक जाडकर (रा. मोडनिंब, ता. माढा), बप्पा उर्फ शिवानंद मेघराज भोसले (रा. बेंबळे, ता. माढा), अजित नवनाथ पाटोळे, महेश उत्तरेश्वर गायकवाड (रा. शेवरे, ता. माढा), चेतन आप्पा काळे, संजय हरिदास दरगुडे, विकास रमेश काळे (रा. चौभेपिंपरी, ता. माढा), समाधान कल्याण जरक (रा. टाकळी, ता. माढा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com