किमान समान कार्यक्रमात उद्योग आणि रोजगारांसाठी 'मोठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

शिवतीर्थावर होणाऱ्या शपथविधीआधी महाराष्ट्र विकास आघाडीने किमान सामान कार्यक्रम घोषित केला असून त्यामध्ये उद्योग आणि रोजगारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात गुंतवणूकवाढीसाठी उद्योजकांना अनेक सुविधा देणे. आयटी क्षेत्रातील गुंतवणूकवाढीसाठी आयटी धोरणामध्ये आवश्यक सुधारणा करणे तसेच, उद्योग परवान्यांचे सुलभीकरण करणारी योजना देणे या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (ता. २८) मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन-दोन नेते शपथ घेणार आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवतीर्थावर होणाऱ्या शपथविधीआधी महाराष्ट्र विकास आघाडीने किमान सामान कार्यक्रम घोषित केला असून त्यामध्ये उद्योग आणि रोजगारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात गुंतवणूकवाढीसाठी उद्योजकांना अनेक सुविधा देणे. आयटी क्षेत्रातील गुंतवणूकवाढीसाठी आयटी धोरणामध्ये आवश्यक सुधारणा करणे तसेच, उद्योग परवान्यांचे सुलभीकरण करणारी योजना देणे या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या सरकारच्या कॅबिनेटची आजच बैठक; काय घेणार निर्णय

तसेच, कामगारांची मुले आणि आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी शून्य टक्के व्याज दराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करण्यात येणार असल्याची घोषणाही किमान समान कार्यक्रमात करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या वतीने आज, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याच वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम सांगितला. पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उशिरा पोहोचले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big announcement for industries and jobs in Common minimum program