नव्या सरकारच्या कॅबिनेटची आजच बैठक; पहिला निर्णय काय असेल?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर आजच (गुरुवार) रात्री आठ वाजता मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पहिला निर्णय काय होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मुंबई : शिवतीर्थावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर आजच (गुरुवार) रात्री आठ वाजता मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पहिला निर्णय काय होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकास आघाडीच्या वतीने आज शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याच वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम सांगितला. 

शेतकऱ्यांना कर्जमाफीसह उद्योगांना चालना; वाचा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम

भाजप समर्थकाला कोर्टानेही फटकारलं; लग्नानंतच्या घटस्फोटात नवीन काय?

काय आहे किमान समान कार्यक्रम :
शेतकरी

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे 
शेतकऱ्यांसाठी तातडीने कर्जमाफीची घोषणा
पिकाचे नुकसान झाल्यानंतर तातडीने भरपाईमिळावी यासाठी पिक विमा पद्धतीत सुधारणा करणे  
शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी ठोस पावले उचलणे
दुष्काळग्रस्त भागात पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी योग्य ती पावले उचलणे 

बेरोजगारी

 

 • राज्य सरकारमधील रिक्त पदांची तातडीने भरती करणे 
 • उच्चशिक्षित बेरोजगारांना शिष्यवृत्ती देणे 
 • नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 80 टक्के आरक्षण देण्या संदर्भात कायदा करणे 

  महिला

 • राज्यात महिला सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार 
 • आर्थिक दुर्बल घटकातील मुलींसाठी मोफत शिक्षण योजना 
 • जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या शहरांमध्ये वर्किंग वुमन होस्टेल उभारणे 
 • अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करणे 
 • राज्यात महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे
   
 • शिक्षण 
 • राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी योग्य पावले उचलणार 
 • कामगारांची मुले आणि आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी शून्य टक्के व्याज दराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार 
   
 • नगरविकास
 • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारणा करणे 
 • महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या कार्यक्षत्रातील रस्त्यांसाठी स्वतंत्र निधीच तरतूद
 • मुंबईसह राज्यातील इतर शहारांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना 
 • पुनर्वसन योजनेत 300 ऐवजी 500 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेली घरे देणे 
   
 • आरोग्य 
 • राज्यात तालुका पातळीवर एका रुपयात आरोग्य चाचणी करणारी केंद्र उभारणार
 • सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्या टप्प्याने वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्टिटल सुरू करणार
 • राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा कवच
   
 • उद्योग  
 • राज्यात गुंतवणूकवाढीसाठी उद्योजकांना अनेक सुविधा देणे
 • आयटी क्षेत्रातील गुंतवणूकवाढीसाठी आयटी धोरणामध्ये आवश्यक सुधारणा करणे 
 • उद्योग परवान्यांचे सुलभीकरण करणारी योजना देणे 
   
 • सामाजिक न्याय
 • अनुसूचित, जाती-जमाती, इतर मागास, भटके विमुक्त आदींचे प्रश्न सोडवणार
 • अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक आणि आर्थिक मागासपण दूर करण्यासाठी योजना राबवणार 
   
 • इतर विषय 
 • ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांमध्ये वाढ करणार
 • अन्न-औषध नियमावलीची पायमल्ली करणाऱ्यांन कडक शासन

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New government What would be the first decision