Sudhakar Bhalerao Join NCPSP: लातूरमध्ये भाजपला धक्का! माजी आमदाराचा शरद पवार गटात प्रवेश; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ताकद वाढली?

Sudhakar Bhalerao Join NCPSP: लातुरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा देत आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
Sudhakar Bhalerao Join NCPSP
Sudhakar Bhalerao Join NCPSPEsakal

लातुरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा देत आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. भाजपाची साथ सोडताना त्यांनी यापुढे ही मित्रांना भेटण्यासाठी येत राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शरद पवार गटाची ताकद वाढल्याचं चित्र आहे.

सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून भाजपचे सलग दोन वेळा आमदार राहिले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना डावलून परभणीचे डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे विजयी झाले. संजय बनसोडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला व सध्या ते क्रीडामंत्री आहेत. आज सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. आगामी विधानसभेच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Sudhakar Bhalerao Join NCPSP
Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडकर वाशिममध्ये रुजू; आरोपांवर एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे आगामी विधानसभेसाठी महायुतीने कंबर कसली असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते आणि उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

Sudhakar Bhalerao Join NCPSP
Worli Hit And Run Case: 12 पेग व्हिस्की अन्...; अपघातापुर्वी मिहीरने काय घेतलं होतं? वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा खुलासा

आज शरद पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तत्पुर्वी आज सकाळीच भालेराव यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

Sudhakar Bhalerao Join NCPSP
Kim Kardashian: किम कार्दशियन मुंबईच्या ऑटोरिक्षाच्या प्रेमात; तिची 'ती' मागणी पूर्ण करण्यावरून प्रशासनात गोंधळाची स्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com