Worli Hit And Run Case: 12 पेग व्हिस्की अन्...; अपघातापुर्वी मिहीरने काय घेतलं होतं? वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा खुलासा

Worli Hit And Run Case: अहवालात उत्पादन शुल्क सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, हा अपघात रविवारी पहाटे 5 वाजता म्हणजे दारूच्या नशेत असताना झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Worli Hit And Run Case
Worli Hit And Run CaseEsakal

वरळीतील बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणाचा तपास सुरू आहे. या अपघातातील मुख्य आरोपी आणि अपघात घडला तेव्हा कार चालवणारा मिहीर शहा यालाही पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. दरम्यान, अपघातापूर्वी आरोपीने मित्रांसोबत मद्य प्राशन केल्याचे वृत्त आहे. स्कूटर चालवत असलेल्या 45 वर्षीय कावेरी नाखवा यांचा रविवारी या अपघातात मृत्यू झाला. तर कार चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अबकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, मिहिर आणि त्याच्या दोन मित्रांनी 12 मोठे पेग म्हणजेच प्रत्येकी 4 पेग व्हिस्की विकत घेतली होती. बारमध्ये भरलेल्या बिलावरून ही माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्कोहोलचे हे प्रमाण एखाद्या व्यक्तीला 8 तासांपर्यंत नशेत ठेवू शकते. मिहीर आणि त्याचे मित्र पहाटे दीडच्या सुमारास बारमधून बाहेर पडल्याचे वृत्त आहे.

अहवालात उत्पादन शुल्क सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, हा अपघात रविवारी पहाटे 5 वाजता म्हणजे दारूच्या नशेत असतानाा झाला. या घटनेनंतर जुहू बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मिहीर 25 वर्षांचा नाही आणि त्याला बारमध्ये दारू दिली जात होती.

Worli Hit And Run Case
Worli Hit And Run Case: राजेश शहा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा कसा झाला, अंडरवर्ल्ड कनेक्शन काय? कुणी केला धक्कादायक आरोप

16 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी

न्यायालयाने काल (बुधवारी) बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शहा याला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर सत्ताधारी शिवसेनेने त्याचे वडील राजेश शहा यांना पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील एका बारमध्ये केलेले अनधिकृत बांधकाम पाडले आहे. जेथे BMW हिट-अँड-रन प्रकरणातील प्रमुख आरोपी अपघाताच्या काही तास आधी कथितपणे मद्य पीत होता.

Worli Hit And Run Case
Worli Hit & Run Case : "आता कुठे गेले टाळकुटेपणा करणारे मराठी कलाकार ?" ; वरळी हिट अँड रन केसवर संजय राऊतांचा मराठी सिनेविश्वाला संतप्त सवाल

बीएमसीने जुहू येथील व्हाइस-ग्लोबल तापस बारमध्ये ही कारवाई केली आणि 3,500 चौरस फूट बेकायदा बांधकाम पाडले. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, के-पश्चिम वॉर्ड ऑफिसची टीम आज सकाळी व्हाइस-ग्लोबल तापस बारमध्ये पोहोचली आणि त्यांनी अनधिकृत बांधकाम आणि त्यात केलेले बदल पाडले.

तळमजल्यावरील सुमारे दीड हजार चौरस फूट अतिरिक्त जागेवर लोखंडी शेड उभारण्यासाठी परवानगी न घेता बांधकाम करण्यात आले तर पहिल्या मजल्यावरील काही जागा बेकायदेशीरपणे बळकावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीच बार सील केला होता. यासंबधीचे वृत्त हिंदी वृत्तवाहिनी लाईव्ह हिंदुस्तानने दिले आहे.

Worli Hit And Run Case
Worli Hit and Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाच्या अडचणीत वाढ; कोर्टाने दिली १६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com